श्री स्वामी समर्थ - अक्कलकोट
श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो.
आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्रीनृसिंहसरस्वती श्रीशैल्य येथून कर्दळीवनामध्ये गेले. तेथे ते तपश्चर्येला बसले. मध्ये साडेतीनशे वर्षे गेली. त्यांच्याभोवती वारूळ तयार झाले. एकेदिवशी एक लाकूडतोडय़ा लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला. त्या वारुळातून श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले, असे सांगितले जाते.
“श्री स्वामी समर्थ” या नावाच्या मंत्राचा जप, आरती व भजने यामध्ये लाखो भक्त दररोज सहभागी होतात.
अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे भक्तांचे जीवन बदलते, हीच त्यांच्या चमत्कारांची साक्ष आहे.
ब्रम्हांडनायक

जन्म: ज्ञात नाही, अक्कलकोट येथे अश्विन व ५ बुधवार १८५७ ला आले
प्रकट दिन: चैत्र शु. २
वेष: दिगंबर (अवधूत)
कार्यकाळ: १८५६ ते १८७८
संप्रदाय: दत्तासंप्रदाय, श्री दत्तांचे चतुर्थ अवतार
समाधी: चैत्र व. १३, १८७८ अक्कलकोट येथे
चरित्रग्रंथ: श्री स्वामी लिलामृत, श्री गुरुलिलामृत
शिष्य: बाळप्पा महाराज, चोळप्पा महाराज, आळंदीचे नृसिंहसरस्वती, रामानंद बिडकर महाराज
स्वामी समर्थ महाराज
गुरु परंपरा

श्री गुरुदत्त
|
श्रीपाद श्रीवल्लभ
|
श्रीनृसिंह सरस्वती
|
श्रीस्वामी समर्थ
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ
चा नेमका अर्थ काय
षडाक्षरी स्वामी नाम ‘श्री स्वामी समर्थ’ हे महाराजांचे नाव नाही, तर ब्रम्हाण्डगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे. ॐ नमः शिवाय, दूं दूर्गायै नमः, श्री गुरुचरित्र हे ज्याप्रकारे षडाक्षरी तारक मंत्र आहेत त्याच प्रमाणे समानार्थी ‘श्री स्वामी समर्थ’ हा सुद्धा सद्गुरु अनुग्रहीत तारक मंत्र आहे. ह्या तारक मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास श्वसनावर अजपाजप संधान केल्यास महाराजांचे अंतरीक आत्मज्ञान चित्त शुद्धीकरण योगातुन सहजच होते. असा आमचा अनुभव आहे. या तारक मंत्राचा मतीतार्थ व्यवस्थित समजुन घेऊन त्यायोगे आत्माचरण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित आत्मप्रत्यययोग सर्व साधारण वेळेपेक्षा अधिक लवकर व आधिक प्रभावकारक होत असतो.
श्री स्वामीं समर्थ या सद्गुरु ब्रम्हवाचक षडाक्षरी तारक बीजमंत्राचा मतीतार्थ खालीलप्रमाणे आहे.
श्री
स्वयं श्रीपदाविराजीत सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज…!
स्वामी – स्वाः + मी
स्वाः म्हणजे भस्म करणे अथवा आत्म समर्पित करणे असा आहे. मी म्हणजे माझे अज्ञान, अहं भाव, रिपु गण व ईच्छ्या…! अर्थात स्वामी म्हणजे माझा मी पणा स्वाः करा.
समर्थ
समर्थ म्हणजे संसाररुपी भवसागर सहज तारुण येण्यासाठी माझे स्वयंभु शिवत्व जागृत करा…!
त्यायोगे ‘श्री स्वामी समर्थ’ म्हणजे श्रीपदविराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मीपण भस्म करुन स्वयंभु शिव तत्व सद्गुरुकृपे अंकित करा.
श्री स्वामी समर्थ
म्हणतात ......प्रारब्ध कुणालाही चुकलेले नाही..
१) स्वामीनंवर विश्वास असणे महत्त्वाचे.
२) प्रारब्ध हे भोगावेचं लागते.
३) स्वामी प्रारब्ध भोगाला पुढे माघे करु शकतात.
४) भक्ती (सेवा) महत्त्वाची.
५) नामस्मरण महत्त्वाचे.
६) आपल्या भक्ती मुळे येणारे दुःख, संकटे जी जितक्या भयानक पध्दतीने येऊ शकतात ती येत नाहीत, आपण हे विसरता कामा नये.
७) सुख आसो किंवा दुःख या दोन्ही वेळेस आपल्या स्वामी भक्ती वर ठाम असावे. फक्त दुःखात त्यांची आठवण नको.
८) मरण हे ठरलेल्या वेळेतचं येणार आधी नाही किंवा नंतर नाही कारण जगी जन्म मूत्यु आसे खेळ ज्यांचा.
स्वामी समर्थ
परम अर्थाचे स्वामी बोल
भगवंताचे सहा सद्गुण असतात. ऎश्वर्य, धर्म, यश, वैभव, ज्ञान आणि वैराग्य हे ते सहा सद्गुण होत. यांनाच ‘भग’ म्हणतात. हे भग ईश्वराकडे असतात म्हणून तो भगवंत. स्वामी महाराज हे साक्षात भगवंतच. पण हे सद्गुण म्हणजे तरी काय ?
१) सुख, समाधान, शांती आणि आनंद हे ऐश्वर्य
२) नीती, न्याय आणि कृपा हा धर्म
३) सर्वत्र, सर्वकाळ कार्याची सिद्धी हे यश
४) निरांतराची ऐहिक व पारलौकिक अनुकूलता हे वैभव
५) निजारूपाची स्पष्ट व नित्य जाणीव हे ज्ञान
६) हे सर्व असूनही निरपेक्ष, निस्वार्थ आणि निरलस राहणे हे वैराग्य
या सहा गुणविशेषांचा पाया असणे याला अधिष्ठान म्हणतात. त्यावरच सत्कार्याची उभारणी होते हे अधीष्ठान देणारा भगवंत असतो.
पूर्व जन्म।तील कर्मे हे ‘संचीत’ असते. वर्तमान जन्मात भोगल्यास येणारा त्यातील अंशभाग म्हणजे ‘प्रारब्ध’. प्रारब्धातील पुण्यरूप सत्कृत्याने सुख, समाधान, तर पापरूप दुशकृत्याने दुःख अनुभवास येते. देव व गुरु सहसा प्रारब्धात ढवळाढवळ करीत नाहीत. प्रारब्ध टाळून टाळता येत नाही. ते कालांतराने पुढे उभे ठाकतेच. म्हणून प्रारब्ध भोगून संपवावे. प्रारब्धात नसलेल्या गोष्टींची प्राप्ती देव गुरु करून देतात तेव्हा ती पुढील जन्मातून घेतलेली उधारी असते.
श्री
स्वामी समर्थ, अक्कलकोट
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ
एक प्रभावी- तारक मंत्र
01
निःशंक हो, निर्भय हो, मना रे प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे अतर्क्य अवधूत हे स्मर्तू गामी अशक्यही शक्य करतील स्वामी ।।१।।
02
जिथे स्वामी पाय तिथे न्युन काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञेविणा काळ ना नेई त्याला परलोकही ना भिती तयाला ।।२।।
03
उगाची भितोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा नको घाबरु तू असे बाळ त्यांचा ।।३।।
04
खरा होई जागा तू श्रध्देसहित कसा होशी त्याविण तू स्वामीभक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ ।।४।।
05
विभूती नमन नाम ध्यानादी तिर्थ स्वमीच या पंच प्राणाभृतात हे तिर्थ घे, आठवी रे प्रचिती न सोडेल स्वामी ज्या घेई हाती ।।५।।
संत श्री समर्थ
सुखी जीवनासाठी स्वामी समर्थांची वचने
१. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
२. जो माझी अनान्यभावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो.
३. आळशी माणसाचे तोंडपाहू नये.
४. शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट रहा.
५. जा तुझे अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग.
६. भिऊ नकोस! पुढें जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी, तुझ्यासाठी आम्ही त्यांचा प्रतिकार करू.
७. आमचे बोलण्यावर विश्वास ठेवा,राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालावा, मोक्ष मिळेल.
८. मी सर्वत्र आहे, परंतू तुझ्यासाठी येथे आलो आता निर्धास्त राहा.
९. हम गया नही जिंदा है.
श्री स्वामी समर्थ महाराज Akkalkot – Shree Swami Samarth Divine Darshan & Teachings
Shree Swami Samarth, Akkalkot Swami Samarth, Swami Samarth Maharaj
Life & Miracles of Shree Swami Samarth Maharaj
Swami Samarth history, Swami Samarth miracles, Akkalkot Swami Samarth
Shree Swami Samarth Maharaj appeared at Akkalkot, Maharashtra, in the 19th century and blessed thousands of devotees with divine miracles. His presence continues through Swami Samarth temples across India and the world. Devotees believe in the power of his mantra and aarati to bring peace, success, and spiritual guidance.
Akkalkot Swami Samarth Darshan & Temples
Akkalkot Swami Samarth darshan, Swami Samarth temples in India, Swami Samarth aarati
The main temple of Swami Samarth is located at Akkalkot, where devotees gather daily for darshan and aarati. Many other Swami Samarth temples exist across India, offering devotees a chance to connect with Maharaj’s divine grace.
Live Darshan available for Swami Samarth Akkalkot
Daily aarati timings & seva details
Special Swami Samarth festival celebrations
Swami Samarth Mantra, Aarati & Bhajans
Swami Samarth mantra, Swami Samarth aarti, Swami Samarth bhajans, Swami Samarth photos
Swami Samarth Mantra: Powerful mantra for peace, protection & blessings
Swami Samarth Aarati: Lyrics & audio of daily aarati in Marathi & Hindi
Swami Samarth Bhajans: Collection of devotional songs, mp3s, and videos
Swami Samarth Photos: HD images for darshan and meditation